कळंब  प्रतिनिधी-

 जागतिक महिला दिनानिमित्त कळंब शहरातील महिलांसाठी दि.११ मार्च २०२३ रोजी  इनरव्हील क्लब कळंब तर्फे 'स्मार्ट श्रीमती कळंब' स्पर्धा साई मंगलम कार्यालय येथे संपन्न झाली.या स्पर्धेसाठी भरपूर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यामध्ये संगीत खुर्ची,तळ्यात मळ्यात,बॉल बास्केट, ग्लासचे मनोरे यासारखे विविध मनोरंजक खेळ व बौद्धिक प्रश्न उत्तरे अशा विविध खेळांच्या फेऱ्या घेण्यात आल्या.अशा विविध फेऱ्यांमधून टॉप १० महिला स्पर्धक निवडण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून स्मार्ट श्रीमती कळंब ठरलेल्या सौ.रूपाली भाग्यवान यांना मानाची पैठणी भेट देण्यात आली. द्वितीय क्रमांक सौ. दिपाली आवाड  व तृतीय क्रमांक सौ.पूजा शिंपले यांचाही पैठणी देऊन गौरव करण्यात आला. शितल शिंदे,सुजाता गायकवाड,दिपाली जगताप,उमा वरपे,रेश्मा सावंत,ज्योती जाधव, धनश्री कवडे या सर्वांना टॉप १० स्पर्धक म्हणून आकर्षक बक्षीसे देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला भोसले केज यांनी विविध खेळ घेऊन कार्यक्रम अधिकाधिक मनोरंजक केला. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक काव्या सिल्क म्युझियम कळंब व गायत्री ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर कळंब यांचे सहकार्य लाभले.तसेच विविध खाद्यपदार्थांच्या व ज्वेलरी,आर्ट स्टॉलमध्ये खरेदीचा महिलांनी आनंद घेतला.

या कार्यक्रमातील विजेत्यांना इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ.सौ वर्षा जाधव व सचिव डॉ. सौ.मीनाक्षी भवर,स्मार्ट श्रीमती कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन सौ. राजश्री देशमुख,सौ.निशा कळंबकर,काव्या सिल्क म्युझियमच्या राठोड मॅडम,गायत्री ब्युटी पार्लरच्या संचालक सौ.धनश्री जाधवर यांच्या हस्ते मानाची पैठणी व व इतर बक्षीसे देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.आकांक्षा पाटील, सौ. वैशाली दशरथ, डॉ.मेघा आवटे,सौ.दिपाली कुलकर्णी,सौ.संगीता घुले,सौ.शितल राजमाने, डॉ.वर्षा कस्तुरकर,डॉ. प्रियंका जाधवर,सौ.स्वाती राजमाने,डॉ.संजीवनी जाधवर,डॉ.अश्विनी पवार, सौ.प्रफुल्लता मांडवकर,डॉ.दिपाली लोंढे,सौ.रेखा तीर्थकर, डॉ.शिल्पा ढेंगळे,डॉ. शितल कुंकूलोळ इत्यादी इनरव्हील मेंबर्सनी परिश्रम घेतले. महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या 'स्मार्ट श्रीमती कळंब'कार्यक्रमाचा असंख्य महिलांनी आनंद लुटला.


 
Top