धाराशिव / प्रतिनिधी -

काँग्रेस नेते  राहुल गांधी  यांनी नीरव मोदी, ललित मोदी व इतर मोदींना चोर म्हणुन ओबींसी समाजाचा आपमान केला आहे. त्याबद्दल त्यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतू काँग्रेस नेते मात्र भाजपवर टिका करीत आहेत.काँग्रेसच्या नेत्याना हे कळत नाहीत, न्यायालय व भाजप वेगवेगळे आहेत. राहुल गांधी यांच्या शिक्षे विषयी त्यांनी कायद्याची बाजू हायकोर्टात मांडावी, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यंानी आंदोलन करताना काँग्रेसच्या नेत्यांना दिला. 

 भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.२५ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसींना धोका... राहुल गांधी बोका, बालीश बुध्दी... राहुल गांधी, यह कैसी संतान है...देश का अपमान है, गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागा‌वी यासह विविध घोषणाबाजी करीत खा. गांधी यांचा निषेध करण्यात आला.  आंदोलनात जि.प.च्या माजी अध्यक्षा अ्स्मिता कांबळे,   दत्ता सोनटक्के ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय शिंगाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य  ॲङ खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज नळे, सरचिटणीस  ॲङ  नितीन भोसले,पांडुरंग लाटे,   तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी,  अभय इंगळे,   इंद्रजित देवकते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top