शिवसेना-भाजपच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव

धाराशिव / प्रतिनिधी-

नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धाराशिव नामफलक लावण्यात आला आहे. याबद्दल  शिवसेना-भाजपच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार आगे बढो, धाराशिव नामकरणाच्या घोषणा देत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.  तसेच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव नामकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन तमाम धाराशिवकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, भाजपा युवामोर्चा चे जिल्हाअध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,न.प माझी उपाध्यक्ष अभय इंगळे, पप्पु मुंडे, रिपाइं आठवले गटाचे विदयानंद बनसोडे, भीमा आण्णा जाधव, नगरसेवक अभिजित काकडे, नगरसेवक दाजी पवार, अॅड.विश्वजीत शिंदे,  रजनीकांत मळाळे, कुणाल धोत्रीकर, राज निकम, अमर माळी, प्रशांत गायकवाड, अनिरुद्ध जोशी, गुणवंत काकडे, संदीप इंगळे सुहास बारकुल व नगरपरिषद चे सर्व कर्मचारी उपस्थित होत.


 
Top