तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील मौ. देवसिंगा तुळ येथील रहिवाशी आणि सद्या पुणे येथील सी ओ ई पी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे निदेशक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी श्री. भगवान बापूराव जाधव यांची महाराष्ट्र शासनाच्या बुद्धिबळ संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे.

केंद्र शासन आणि ओडिसा राज्य शासन यांच्या विध्यमानाने भुवनेश्वर, ओडिसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ स्पर्धा 2022-2023 या दिनांक 11 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड चाचणी दि.01 आणि 02 मार्च 2023 रोजी सचिवालय जिमखाना मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये श्री. भगवान जाधव यांची निवड झाली असून महाराष्ट्र शासनाच्या बुद्धिबळ संघांचे कर्णधार म्हणून निवड झाली आहे, जाधव यांच्या निवडीबद्दल देवसिंगा तुळ येथील नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे.


 
Top