धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्हा माहेश्वरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पांडूरंग मुंदडा यांची व सचिवपदी जवाहरलाल बन्सीलाल गिल्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

धाराशिव येथील बालाजी मंदिर येथे रविवार, 26 मार्च रोजी पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत माहेश्वरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, प्रदेश सचिव मदनलाल मिनियार, जिल्हाध्यक्ष गिरधारीलाल चांडक, सचिव जुगलकिशोर लोया, मराठवाडा निवडणूक अधिकारी संजय मंत्री, जिल्हा निवडणूक अधिकारी विजय मुंदडा, जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकारी अ‍ॅड. सचिन मिनियार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

बैठकीत भन्साळी म्हणाले की, माहेश्वरी संघटनेच्या पदांवर निवड होणे ही एक जबाबदारी आहे. जो कोणी हे पद भुषवेल त्यांनी आपल्या पदाला तितकाच न्याय देणे आवश्यक आहे. जिल्हाध्यक्ष मुंदडा हे माहेश्वरी संघटनेला पूर्ण न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माहेश्वरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विष्णुदास तोष्णीवाल (बलसूर), जुगलकिशोर लोया (धाराशिव), संघटनमंत्रीपदी कचरूलाल मिनियार (धाराशिव), कोषाध्यक्षपदी ब्रिजमोहन बांगड, संयुक्तमंत्रीपदी जयकिशन सारडा (धाराशिव), शिवप्रसाद लड्डा (उमरगा) यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top