धाराशिव / प्रतिनिधी-

माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी विविध विषयांवर मागील 25 वर्षात लिहिलेल्या आणि विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या परखड लेखांचा संग्रह असलेल्या सत्य असत्याशी मन केले ग्वाही (लेखसंग्रह) या पुस्तकाचे 30 मार्च रोजी धाराशिव येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे.

धाराशिव येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 30 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे. एबीपी माझा वृत्तवाहिणीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नानासाहेब पाटील अमृत महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top