धाराशिव / प्रतिनिधी-

 वैयक्तिक असेल अथवा आपल्या मुलांचे फिटनेस बाबतीत जाग्रुकता वाढल्याचे सध्या दिसुन येत आहे. चांगले फिटनेस राहन्याच्या द्रुष्टिकोनोतुन स्पोर्टस् अतिशय महत्वाचे आहे. योग्य फिटनेस हवे असेल तर एखादे स्पोर्टस् सेंटर जॅाईन करा, शेवटी कोनीही कोनत्याही वयात स्पोर्टस् जॅाईन करु शकत असल्याचे मत महिमा मात्तुर यांनी व्यक्त केले.

धाराशिव येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने आयोजीत जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेसह जागतीक महिला दिन निमीत्त आयोजीत महिलांचे संगीत खुर्ची स्पर्धेचे पारीतोषीक आणि खेळाडुंना टिशर्ट वितरण प्रसंगी समाजसेविका महिमा मात्तुर बोलत होत्या. पारीतोषीक आणि खेळाडुंना टिशर्ट वितरण समाजसेविका महिमा मात्तुर, प्राचार्या रम्या तुतीका, अॅडव्होकेट रेखा जगदाळे, उद्योजीका स्वाती गडदे, शिक्षिका वर्षा वाघोलीकर यांच्या हस्ते करन्यात आले. यावेळी जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या

पदाधिकार्यांसह, खेळाडु व पालकांची प्रमुख उपस्तिथी होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेच्या पदाधिकार्यांसह मार्गदर्शक व खेळाडु्ंनी परिश्रम घेतले.

 
Top