धाराशिव / प्रतिनिधी- 

शिवाजीराव साळुंके गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी विजय भोसले आणि भीमा जाधव यांची उपाध्यक्षपदासाठी सुवर्णा प्रमोद साळुंके आणि विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ही  निवड करण्यात आली.

शहरातील नामवंत अशी गृहनिर्माण संस्था असा लौकिक असलेल्या शिवाजीराव साळुंके गृहनिर्माण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांपूर्वी बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन तालुका निबंधक कार्यालयाने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी बाळासाहेब कोरे यांच्या उपस्थितीत रविवारी साळुंके नगर येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुढील पाच वर्षांकरिता अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवाजीराव साळुंके गृहनिर्माण सहकारी संस्था क्रमांक दोनच्या अध्यक्षपदी भीमा जाधव यांची तर उपाध्यक्षपदी विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. तर संस्था क्रमांक तीनच्या अध्यक्षपदी विजय भोसले यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदासाठी सौ. सुवर्णा प्रमोद साळुंके यांची निवड एकमताने करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा यावेळी पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

 
Top