कळंब / प्रतिनिधी- 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नसता आंदोलन छेडण्याचा,इशारा मा.संचालक सतीश टोणगे यांच्या सह  व्यापारी वर्गाने दिला आहे.

    कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समिती मधील रस्त्यांची दुर्दशा झालेली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था आहे .यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. व्यापारी, शेतकरी, यांच्यासाठी  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी. अतिक्रमणे काढण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्यात यावा. शेतकऱ्यांच्या माल इतर बाजारपेठेत जाणार नाही यासाठी उपाययोजना करावी. व्यापारी, हमाल, मापाडी तसेच आडती वर काम करणाऱ्या महिलांना बाजार समितीने विम्याचे कवच द्यावे.  बाजार आवारात रात्रपाळीसाठी सुरक्षा रक्षक  ठेवण्यात यावेत. तसेच शेतकरी, व्यापारी यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी .

धाराशिव जिल्ह्यात कळंब बाजार पेठ ही सर्वात मोठी असून, सर्वात जास्त महसूल या बाजार समितीमध्ये जमा होत आहे. कसल्याही सुख सोयी नसल्याने शेतकरी व्यापारी यांची मोठी नाराजी असून तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास, आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी वर्गाने दिला आहे.

     या निवेदनावर बाजार समितीचे माजी संचालक सतीश टोणगे, व्यापारी असोसिएनचे अध्यक्ष नंदकिशोर मोरे,  अड.दिलीपसिंह देशमुख ,बाळासाहेब धस, वैभव कळसाईत, प्रतीक सोनटक्के, संतोष धस, नाना यादव, किरण टेकाळे, अण्णासाहेब वाघमोडे, शिवहार गुजर, अच्युत मंडळे,  भा.ज. प. च शहर अध्यक्ष भैया बावीकर, अशोक चोंदे, सुंदर भंडारे, सिद्धेश्वर कळसाईत, दिनकर काळे, दत्तात्रेय भराडे, ॲड.मनोज चोंदे, सुनील मगर, समाधान पौळ, नरेश कुलकर्णी ,उत्तरेश्वर जाधव, सुरज लांडगे, किशोर तोर, भाग्यवंत घुगे, भारत आव्हाड, संदीप वाघमारे,तानाजी चोंदे, वैभव पाटील ,जगजीवन मडके, संभाजी मिटकरी, पवन भराटे, विनायकराव लोकरे, रोहन पारख, तुकाराम धस, सुनील मगर, मधुकर खोसे,शरद जाधवर,प्रशांत पडवळ, अजय जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top