धाराशिव / प्रतिनिधी-

आदिवासी पारधी महासंघ धाराशिव   येथे एकूण दहा जिल्ह्याची अध्यक्ष निवड करून त्यांना नियुक्त पद आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब साळुंखे साहेब तसेच महासचिव राणाजी सोनवणे साहेब व आदिवासी पारधी महासंघाचे कार्याध्यक्ष माननीय सुनील जी काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दहा जिल्ह्याचे अध्यक्षपद निवड करण्यात आल्या.

 सर्व जिल्हाध्यक्षांना पुढील सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन व सामाजिक संघटन व समाजातील तळागाळातील सर्वसामान्य आदिवासी बांधवांपर्यंत आदिवासी विभागाकडून विविध योजनेचे लाभ कशा पद्धतीने पोहोचवण्यात येईल व त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याकरता व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील खेड व तांडा वाड्या वस्ती आदिवासी पारधी महासंघाचे शाखा स्थापन करावे व संघटनेचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे संघटनेच्या माध्यमातून आपण व आपल्या समाजावर होणारे अन्याय दूर होऊ शकते असे सर्व अनमोल मार्गदर्शन व पुढील कार्यासाठी चांगल्या विचाराची शिदोरी माननीय संस्थापक अध्यक्ष साळुंखे  व कार्याध्यक्ष काळे  यांनी मार्गदर्शन केले व प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापले मनोगत व्यक्त केले शेवटी आभाराचा कार्यक्रम बापू पवार   यांनी व्यक्त केले .

  यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष  पदी   बापू पवार, लातुर  जिल्हाध्यक्षपदी लालासाहेब काळे , सोलापूर  जिल्हाध्यक्ष  पदी अनिल  चव्हाण , अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश  काळे, सांगली जिल्हाध्यक्षपदी बसवराज चव्हाण  ,जालना जिल्हाध्यक्ष  पदी संजय  काळे, बापु पवार: प्रदेश  संघटक पदी संजय  काळे ,  प्रदेश  सचिवपदी संजय  पवार, महिला  कार्याध्यक्ष धाराशिव पदी मनिषा  नारायण  शिदे राज्य  संघटक  पदी आण्णा  जोतिराम  चव्हाण  विदर्भ  अध्यक्ष  पदी  सुखदेव  कर्मचारी   आघाडी  सोलापूर  जिल्हाध्यक्ष  पदी शिधराम  चव्हाण आदींची निवड करण्यात करण्यात आली. 

  महाराष्ट्रतुन या कार्यक्रमास आदिवासी पारधी  समाजातील यावेळी  कार्यकर्ते  उपस्थित  होते  व त्यांना  मार्गदर्शन  आप्पासाहेब  साळुंखे,   राणा सोनावणे , सुनिल  काळे  यांनी  केले  तसेच  संचालन  निपाणेकर सराने  केले. 


 
Top