कळंब/ प्रतिनिधी-

 तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधिर विद्यालय कळंब जि.धाराशिव येथे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊचे व फळांचे वाटप करण्यात आले.

परमपूज्य गुरुमाऊली यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व बालसंस्कार केंद्र कळंब देवी रोड यांच्यावतीने श्री ज्ञानेश्वर मूकबधिर निवासी महाविद्यालय या ठिकाणी खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा प्रतिनिधी संजय होळे, पत्रकार शिवप्रसाद बियाणी,  प्रतिभाताई भवर,  मकरंद शेटे. तन्मय जाधव.  सुप्रिया होळे,  मिनाक्षी बियाणी, अंजली शिंदे, ललिता कसबे, ऐश्वर्या वायसे, प्रेरणा वेदपाठक, शिवानी कापसे अमृता सिंगणापुरे, यांच्या हस्ते  मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊचे व फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुकबधिर शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, विशेष शिक्षक आश्रुबा कोठावळे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी  प्रतिभा  भवर यांनी मार्गदर्शन केले त्यात लहान मुलावर जितक्या लवकर जास्त आध्यात्मिक व शैक्षणिक संस्कार दिले गेले त्यातून त्यांची प्रगती होत राहते. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे इतक्या वेगवान जीवनशैलीमध्ये हे युग चालत आहे त्यानुसार बालमनावर जितके जास्त संस्कार आध्यात्मिक केले गेले त्यामुळे त्यांची प्रगती होत राहते.


 
Top