तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरसह तालुक्यात रंगपंचमी सण रविवार दि.१२रोजी पारंपारिक पध्दतीने रंग खेळुन मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला. 

येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात देवीजींस  दही,दुध,पंचामृत, अभिषेक करण्यात आल्यानंतर  वस्ञोलंकार घालण्यात घालण्यात आले.नंतर  देविजींच्या मुखास व अंगावर सप्तरंग   शिंपडण्यात आल्यानंतर  सर्वञ  रंगोत्सव साजरा करण्यास आरंभ झाला. सकाळी बच्चेकंपनीने रंग खेळण्यास आरंभ केला तर दुपारी ऊन कडाका वाढताच  रंगोत्सवास एकच उधाण आले  आज रंगपंचमी निमित्ताने देविजींना पुरणावळीचा नैवध दाखविण्यात आला.


 
Top