तुळजापूर  / प्रतिनिधी-

   तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मुकुंद गायकवाड यांनी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. संस्थेच्या वतीने त्यांचा याप्रसंगी शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.

 बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर यांच्या उपस्थितीत डॉ. मुकुंद गायकवाड यांनी सर्वप्रथम आपला पदभार स्वीकार त्यानंतर संस्थेच्या वतीने सचिव उल्हास दादा बोरगावकर यांनी त्यांच्या सत्कार केला याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, ज्युनिअर उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ. मनोज झाडे, डॉ. शेषराव जावळे, डॉ. अमोद जोशी, डॉ. राजेश भोपलकर, डॉ. अशोक मरडे डॉ. राजू कदम, डॉ. पांडुरंग शिवशरण, डॉ. ज्योतिबा राजकोंडा, डॉ. अशोक कदम, डॉक्टर शिवाजी जेठीथोर, डॉ. मंदार गायकवाड, डॉक्टर अभिजीत बाबरे, पांडुरंग नागणे, सनी बनसोडे, प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव  उल्हासदादा बोरगावकर यांनी नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड यांना आपल्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर शेतकऱ्याला उत्तर नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड यांनी दिले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, डॉ. गोविंद काळे , डॉ. मनोज झाडे, प्रा रमेश नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले. कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित प्राचार्यांना आपल्या शुभेच्छा दिल्या.


 
Top