उस्मानाबाद / धाराशिव :- 

 जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण कल्याण समितीच्या वतीने अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडेवार व मेट्रन,इन्जार्ज सिस्टर प्रेमा निंबाळकर,

श्रीमती व्हटकर अन्य इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी महिला भगिनी यांचे अभिष्टचिंतन पुष्पगुच्छ देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यातआल्या.

सेवानिवृत्त रौफ शेख ब्रदर यांनी त्यांच्या शायरी शैलीत माता विषयी शायरी गायली.वैद्यकिय अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडेवार मॅडम यांनी मनोगतात म्हण्टले की,महिलांच्या सन्मानार्थ आजचा दिवस असुन महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.उदयकुमार पाध्ये,डॉ.मुंदेवाडी सर,डॉ महाजन सर,डॉ.देवकते सर,डॉ.पिरजादे सर, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,पत्रकार श्रीकांत मटकीवाले, सेवानिवृत्त रौफ शेख ब्रदर,लिनन विभागाचे अंकिज सवाई,सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top