परंडा /प्रतिनिधी - 

येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संतोष काळे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्तात्रेय मांगले उपस्थित होते.   

  यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्राध्यापिका डॉ वैशाली थोरात, प्रा सातव, प्रा कीर्ती पायघन, प्रा प्रतिभा माने, श्रीमती पल्लवी देशमुख, श्रीमती कोठुळे सुनंदा, श्रीमती पद्मा शिंदे यावेळी उपस्थित होत्या.

    प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन  मार्गदर्शन केले ते म्हणाले की महिलांचे सर्वच क्षेत्रांमध्ये अनमोल योगदान  लाभले आहे. देशातील सर्वच महिलांना आपले हक्क आपले अधिकार आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी आपल्या घरातील सर्वच महिला प्रति आदर व्यक्त करण्यासाठी देशांमध्ये मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागा तर्फे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा दत्तात्रेय मांगले यांनी मानले.


 
Top