नळदुर्ग / धाराशिव :- 

  नळदुर्ग येथील शंकर वाघमारे हा बॉलिवुड स्टार अजय देवगन यांचा चाहता आहे. बॉलीवुड स्टार अजय देवगन यांचा हिंदी चित्रपट भोला या चित्रपटाचा नुकताच मुंबई येथे ट्रेलर ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमास शंकर वाघमारे यांनी हजेरी लावुन सिनेस्टार अजय देवगन यांची भेट घेतली. शंकर वाघमारे यांची अजय देवगनसोबतची ही दुसरी भेट आहे. यावेळी अजय देवगन यांनी शंकर वाघमारे यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर अजय देवगन यांनी शंकर वाघमारे यांना रुद्राक्ष माळ तसेच ओम नमो शिवाय असे नाव असलेली शाल भेट देऊन त्यांचा सन्मान केला.सिनेअभिनेते अजय देवगन यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर शंकर वाघमारे यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या सत्कारानंतर 'आज आपण धन्य झालो' असल्याची प्रतिक्रिया शंकर वाघमारे यांनी दिली आहे.  

       बॉलीवुड स्टार अजय देवगन यांचा हिंदी चित्रपट "भोला"हा ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.हा "भोला" चित्रपट सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन पाहावे असे आवाहन शंकर वाघमारे यांनी केले आहे.

        शंकर वाघमारे हे गेल्या २१ वर्षांपासुन नळदुर्ग येथे सिनेस्टार अजय देवगन यांचा वाढदिवस साजरा करतात यावेळी शंकर वाघमारे यांच्याकडून विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जाते.

 
Top