धाराशिव / प्रतिनिधी-

सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या आदेशामुळे धाराशिव पीक विमाबाबत बजाज कंपनीच्या चेअरमनला न्यायालयाने अवमान नोटीस पाठवली असून त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. शिवसेनेच्या उपोषणामुळे जिल्हाधिकारी यांनी खंबीरपणे न्यायालयात बाजू मांडल्याने न्यायालयाने पीकविमा कंपनी व कंपनीच्या एजंट ला चपराक दिली असल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. 

नफेखोरीचे लालस उत्पन्न झालेल्या पीकविमा कंपनीने या निकालाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पीकविमा कंपनीकडून 200 कोटी रुपये भरुन घेवून शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करणेबाबत आदेशित केले होते. उर्वरित 315 कोटी रुपये भरणेबाबत सदरील पीकविमा कंपनीने दिरंगाई केली होती. आज यावर सुप्रिम कोर्टाचा न्यायमुर्ती भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली 2 सदस्य खंडपीठाने बजाज अलायंन्स इंन्शुरंन्स कंपनीस 315 कोटी रुपये भरणेबाबत आदेशित करत सदर कंपनीस न्यायालयाचा सुप्रिम दणका दिला आहे.

 आजच्या तारखेला शासनाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट जनरल अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  शिवसेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कंपनीच्या विरोधात आवमान याचीका दाखल केली व उपोषणाच्या रेट्याने जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्याची बाजू कोर्टामध्ये खंबीरपणे मांडण्यात आली याचा परिणाम म्हणुन न्यायालयाने कंपनीचे प्रमुख अमित अग्रवाल यांना व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतरची सुनावणी 3 आठवड्याने ठेवली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला आनंद निर्माण झाला असून नविन वर्षाच्या सुरुवातीस आनंदाची मिळाल्याने गुढीपाडवा गोड झाल्या असल्याची भावना निर्माण झाली आहे.

 
Top