धाराशिव/प्रतिनिधी -

 : चालू आर्थिक वर्षात प्रत्येक महिन्यात पगारास विलंब केला जात असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने पगार वेळेवर करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. 

जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी उद्दिष्टानुसार काम करीत आहेत. त्यामुळे जिल्हा मागील काही वर्षापासून पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहित आहे. असे असतानाही जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेस होत नाही. दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनास विलंब होत आहे. पगारच वेळेवर होत नसल्याने गृह कर्जाचे हप्ते, वैद्यकीय उपचाराचा खर्च भागविणे कठीण होत आहे. फेब्रुवारी महिन्याचा पगार मार्च १३ मार्चपर्यंतही झाला नाही. त्यामुळे धरणे आंदोलनास बसावे लागल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. महिन्याचा पगार प्रत्येक महिन्याच्या १ तारेखस करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मुंडे, सचिव संतोष शिंदे, कार्याध्यक्ष सुनिल मिसाळ, कोषाध्यक्ष पांडुरंग पांचाळ आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top