तुळजापूर  / प्रतिनिधी-

  शहरातील युवाष खेळाडू प्रियंका किरण हंगरगेकर ची राष्ट्रीय साॅफ्ट टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघात निवड झाली आहे. साॅफ्ट टेनिस असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव राजेंद्र सोनवणे यांनी प्रियंका हंगरगेकर च्या निवडीचे पत्र दिले आहे. 

 भुवणेश्वर - ओडीसा येथे १९ - २३ मार्च दरम्यान  १९ वी वरीष्ठ राष्ट्रीय साॅफ्ट टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धा होत आहे.  यासाठी १४ - १७ मार्च दरम्यान पुण्याच्या वारजे मालेवाडी येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियंका हंगरगेकरला प्रशिक्षक संजय नागरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

  प्रियंका हंगरगेकर च्या निवडीचे साॅफ्ट टेनिस असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, उस्मानाबाद जिल्हा असोसिएशन चे अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव सिराज शेख, प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे, सतीश हुंडेकरी, प्रदिप अमृतराव, जगदीश पलंगे आदींनी अभिनंदन केले आहे. 

 
Top