आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली. 13.3.2023 रोजी सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात  एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले.सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.

 सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे.  गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली.  ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील सातारा येथील, सुरेखा यादव या, 1988 मध्ये भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. तिच्या कामगिरीसाठी, तिला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 
Top