धाराशिव/ प्रतिनिधी - 

 भाडेतत्वावर लावलेल्या दोन गाड्यांचे सहा महिन्याचे बिल काढण्यासाठी लॉगबुकवर सही करण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच घेताना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी शंकर राठोड व अपघात विभागातील सेवक राजू राम थोरात यांना   लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पाेलिस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास राठोड व पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके आदीं टीम ने केली आहे. 

 
Top