धाराशिव / प्रतिनिधी-

राज्याच्या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करुन अनूसचित जमातीच्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धनगर समाज बांधवांच्या वतीने स्वागत करुन मोठा जल्लोष करण्यात आला. शनिवारी (दि.11) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करुन पेढे वाटून समाजबांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.

 धनगर समाजाकरिता 1000 कोटी रुपये तसेच 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून बांधवांना 10 हजार कोटीचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचबरोबर राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबद्दल धाराशिव येथे धनगर समाजबांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांच्या आतषबाजीत निर्णयाचे स्वागत केले. त्याचबरोबर समाजाला न्याय दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 यावेळी अ‍ॅड.खंडेराव चौरे, राजसिंह राजेनिंबाळकर, इंद्रजित देवकते, पिराजी मंजुळे, श्याम तेरकर, श्रीकांत तेरकर, बालाजी तेरकर, गणेश एडके, ज्ञानेश्वर सूळ, सचिन लोंढे, जगदीश जोशी, प्रसाद मुंडे, ओंकार देवकते, अरविंद देवकते, नवनाथ सोलंकर, संतोष वतने, आप्पासाहेब घायाळ, तुकाराम माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top