वाशी / प्रतिनिधी-

 आज पारा येथील महाविकास आघाडीतील कार्यकर्ते  विश्वभर भराटे,विकास पंडितराव पानसे,  यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ  तानाजीराव सावंत  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून. सन्मानीय  केशव सावंत  संचालक डी सि सि बँक तथा कार्यकारी संचालक भैरवनाथ शुगर वर्क्स वाशी..वाशी तालुक्याचे शिवसेना नेते  प्रशांत बाबा चेडे  यांच्या मार्गदर्शनाखाली व नागजी बापू नाईकवाडी (मा.नगराध्यक्ष न.पं.वाशी तथा विधानसभा संपर्कप्रमुख) यांच्या हस्ते शिवसेनेत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.

 यावेळी  बळीराम  वैद्य (शिवसेना नेते पारा) शिवहार स्वामी (शिवसेना तालुकासंघटक) प्रवीण गायकवाड (युवा सेना तालुकाप्रमुख) प्रवीण देशमुख (युवा सेना उपजिल्हाप्रमुख) विकास तळेकर (शिवसेना उपतालुकाप्रमुख) विष्णुपंत मुरकुटे (मा.उपसभापती पं.स वाशी) अतुल चौधरी (उपसरपंच पारा) मदन मुरकुटे (मा. सरपंच फक्रबाद) पारा येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत उर्फ पप्पू पांचाळ आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top