उमरगा/ प्रतिनिधी-

माणसांनी आपले वर्तन पवित्र ठेवून धम्म आत्मसात करावा संसारिक जीवनात जीवन जगतांना भवचक्रात गुरफटून जाऊन शिलाचारणा कडे जे दुर्लक्ष करतात त्यांच्या वाट्याला दुःखच येते म्हणून आपले जीवन निर्दोष होण्यासाठी धम्म आचरण करावे असे मत कपिल वस्तू बुद्ध विहार कराळी येथील भन्ते सुमंगल यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील दाळिंब येथील बोधिसत्व बौद्ध विहारात सोमवारी (दि.२७)रोजी धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ रंजनाताई सातपुते या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी धम्मभूषण, धम्ममित्र प्रियदर्शि,जी.एल.कांबळे, भीमाशंकर सुरवसे, संदीपान सुरवसे, दिलीप गायकवाड,सुधाकर गायकवाड यांची उपस्थिती होती.

या वेळी भन्तेजीच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले तर शिवाजी कांबळे, खंडेराव सुरवसे,अंजनाबाई सुरवसे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तींचे पूजन करण्यात आले.समर्पण समारोह धम्ममित्र जी.एल.कांबळे यांनी घेतला. आपल्या धम्म देसनेत धम्मचारी धम्मभूषण म्हणाले की, बौद्ध विहार हे संस्कार केंद्र होण्यासाठी तरुण व महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे विहारातुन संस्कारा सोबत ज्ञानाचे धडे दिले गेल्यास समाजातील अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.या वेळी मधुकर सुरवसे यांनी रमाई गीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा सुरवसे, कविता रणे, शीतल गायकवाड, सुनीता सुरवसे,रेखाताई गायकवाड, उंबर गायकवाड, नवनाथ गायकवाड, शरद गायकवाड, प्रभाकर सुरवसे, चंद्रकांत गायकवाड, मारुती कांबळे,विश्वंभर गायकवाड,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र जी. एल. कांबळे यांनी केले तर सुधाकर गायकवाड यांनी आभार मानले बोधिसत्वाच्या चार प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top