धाराशिव / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी निगडीत असलेल्या धाराशिव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नेहमीप्रमाणे यंदाही बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी प्रल्हाद मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी नितीन तावडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

धाराशिव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या 12 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या सर्व जागांवर एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विजयी उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा त्यानंतर सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद मुंडे, उपाध्यक्षपदी नितीन तावडे तर संचालकपदी आबासाहेब कोकाटे, प्रभाकर राजेनिंबाळकर, नागेश जगदाळे, बाळकृष्ण झाडे, नितीन शेरखाने, खंडेराव चौरे, प्रकाश पाटील, श्रीमंत देवकते तर महिला संचालक म्हणून पुष्पा रामचंद्र उंबरे, अल्का व्यंकटेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. 


 
Top