धाराशिव / प्रतिनिधी-

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील क्रांती चौक भीमनगर येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 18, 19 व 20 मार्च या कालावधीत सायंकाळी 6 वाजता होणार्‍या या व्याख्यानमालेस नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

 आजच्या तरुणाईला महापुरुषांच्या विचारांचा विसर पडत चालला असून सोशल मीडियापुरतेच विचार मर्यादित झाले आहेत. त्यामुळे महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत शनिवार, दि. 18 रोजी रवींद्र केसकर यांचे "सगळ्यांची आई रमाई" या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार, दि. 19 रोजी प्रा.सुरेश वाघमारे यांचे "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महाडचा सत्याग्रह" तर सोमवार, दि.20 मार्च रोजी प्रा.रावसाहेब कसबे यांचे "डॉ.बाबासाहेब आंबेडकर- एक मुक्तचिंतन" या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

 व्याख्यानमालेसाठी संयोजन समितीचे सदस्य सागर चव्हाण, सुगत सोनवणे, महेश डावरे, लखन जानराव, ताहेर शेख, यशवंत शिंगाडे, सिद्धार्थ सोनवणे, अविनाश शिंगाडे, आकाश वाघमारे, सुमित शिंगाडे, प्रफुल्ल पवार, विजय उंबरे, सौरभ शिंगाडे, प्रशांत कांबळे, सारीपूत शिंगाडे, आदित्य काळे, प्रीतम शिंगाडे, योगेश वाघमारे, प्रज्ञावंत ओहाळ, बापू साबळे, बापू माने, सुरज शहापालक परिश्रम घेत आहेत.


 
Top