तुळजापूर / प्रतिनिधी-

 सैनिक संरक्षण कायदा झाला तरच सैनिकांचे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते माजी सैनिक दीपक   शिर्के यांनी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे  राज्यव्यापी महाप्रबोधन  यात्रा  आगमन पार्श्वभूमीवर आयोजित  कार्यक्रमात केले.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सोमवार दि  13 मार रोजी  शहरांमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते माजी सैनिक दीपक   शिर्के, ॲड संभाजीराव मोहिते,  श्री.जाधव  ,  पोपट पडवळ,  वसंतराव आजमाने,  तातेराव मुंडे , राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल यांच्या उपस्थितीमध्ये महा प्रबोधन यात्रेचे आगमन झाले. या समय महाप्रबंधन यात्रेचे स्वागत गोकुळ शिंदे यांनी केले.

   मान्यवरांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेऊन महाप्रबोधन यात्रेचे रूपांतर महाप्रबोधन बैठकीमध्ये झाले.  प्रबोधन बैठकीमध्ये माजी सैनिक सेलचे प्रदेश अध्यक्ष दीपक   शिर्के, ॲड. संभाजीराव मोहिते, सुरेश   बिराजदार , गोकुळ   शिंदे, श्याम घोगरे , दत्ता नवगिरे, शिवाजी सावंत यांनी प्रबोधन बैठकीमध्ये माजी सैनिकांना मार्गदर्शन केले व उपस्थित असलेल्या माजी सैनिकांनी धाराशिव जिल्ह्यातील अडीअडचणीबाबत व काही त्यांच्या समस्येबाबत प्रदेशाध्यक्ष यांना सूचना केल्या. या बैठकीची प्रस्तावना पोपटराव पडवळ यांनी केली. यावेळी माजी सैनिक व राकाँचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top