तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि डॉ.आदर्श मेहता आय अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल,सोलापूर यांच्यावतीने (दि.१६) फेब्रुवारी रोजी मोफत नेत्ररोग निदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात तब्बल २०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली होती यात २४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे समोर आले होते.

 या शिबिरादरम्यान प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर रेश्मा मेहता यांनी २४ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले होते, या रुग्णांवर डॉ. आदर्श मेहता आय अँड आर्थोपेडिक हॉस्पिटल सोलापूर येथे फेब्रुवारी महिन्यात १४  रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तदनंतर ( दि. १०) मार्च रोजी १० रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली, या शिबिराच्या माध्यमातून तब्बल २४  रुग्णांवर   फॅको पद्धतीने फोल्डेबल लेन्स बसवून बिनटाक्यांचे शास्त्रक्रिया करण्यात आली, श्री.पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि डॉ.आदर्श मेहता हॉस्पिटल सोलापूर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया , तसेच मोफत चष्मे व औषधे  वाटप करून गरजू रुग्णांचे आरोग्य सेवा केल्या बद्दल सावरगाव परिसरात जैन ट्रस्ट  यांचे कौतुक करण्यात येत आहे, शिबिर यशस्वीपणे पार पाडून रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडेपर्यंत  दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी पद्मकुमार मेहता यांनी परिश्रम घेतले. 


 
Top