कळंब / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील येरमाळा  शेतात झोपण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा अज्ञातानी दगडाने ठेचून खून केल्याची घटना येरमाळा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.  या प्रकरणी संशयाची सुई तरुणाच्या बापाकडे वळाली आहे. 
 येरमाळा येथील रामराजे सतीश बारकुल (२३) हा बुधवारी रात्री येरमाळा कळंब रोडलगत असलेल्या आपल्या शेताकडे झोपण्यासाठी गेला होता. गाेठ्याजवळ झोपलेला असताना अज्ञातांनी त्याच्या डोक्यात दगड घालूव व नंतर चेहरा दगडानेच ठेचून खून केला. हा प्रकार सकाळी वडील जनावरांचे दूध काढण्यासाठी शेताकडे गेल्यावर त्यांच्या निदर्शनास आला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणाचा चेहरा दगडांनीच झाकून ठेवला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार सतिश बारकुल व त्यांचा मुलगा रामराजे यांच्यात सतत वाद-विवाद होत होता. बुधवारी रात्री तो दारू पिऊन आल्यावर बाप लेकामध्ये कुरबूर झाली. वडीलांसह आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यानंतर तो शेतात निघून गेला. 
बापला झाला पश्चाताप 
रामराजे यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर रामराजे यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर रामराजेचे वडील सतीश बारकुल यांना पाश्चाताप होऊन त्यांनी आपल्या लहान भावास खून केल्याचे सांगितले. त्यानंतर लालासाहेब बारकुल यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
Top