परंडा / प्रतिनिधी-

 तालुक्याच्या पुर्व विभागाला जोडणारा शेळगाव येथिल खैरी नदीवरील  पुलाच्या नव्या उभारणीला राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी तब्बल दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याने पूल उभारणीच्या कामाला शुक्रवारी प्रत्यक्षात सुरुवात झाली. या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. 

    शेळगाव पासून हाकेच्या अंतरावर खैरी नदीवर निम्न खैरी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात हा प्रकल्प पुर्णक्षमतेने भरून  ओव्हरफ्लो  झाल्यानतंर शेळगाव येथिल पूल नेहमीच पाण्याखाली गेतो, परिणामी शेळगावचा परंडा तालुक्याच्या पुर्व पट्टयाशी संपर्क पुर्णपणे तुटला जात होता. पुलाच्या पुर्व बाजूला माणीकनगर याठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शाळा असून, पूल पाण्याखाली गेल्यानतंर विद्यार्थ्याना शाळेला मुकावे लागत होते. पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होऊन शेळेगावसह या मार्गावरील इतर गावांचा तालुक्याशी पुर्णपणे संपर्क तुटल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत होता. गेल्या दशकापासून  खैरी नदीवर नव्याने पूल उभारणीची मागणी ग्रामस्थ करीत होते. मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे पूल निर्मीतीचा प्रश्न मागे पडला होता, मात्र हि समस्या गार्भीयांने घेत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पुलाच्या उभारणीसाठी तब्बल दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरील पुलाच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्तात्रय मोहीते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जालिंदर मळगीकर, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, भूम शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, वाशी माजी सभापती सतिष दैन, शिवसेना परंडा शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, आरोग्यदूत बालाजी नेटके, दत्ता महाराज रणभोर, माजी नगरसेवक सतिष मेहेर, जयदेव गोफणे, तानाजी कोलते, विशाल ढगे, औंदुबर गाडे, सरपंच जैनुद्दीन शेख, शुक्राचार्य ढोरे उपस्थित होते.


 
Top