धाराशिव / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा रास्त भाव व केरोसीन दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना   निवेदन देण्यात आले आहे . 

यात निवेदनात म्हटले आहे की   येतील रास्त भाव दुकानदार जयराम कापसे यांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी ए.पी.एल शेतकरी शिधापत्रिका धारक पांडुरंग साखरे यांनी दारू पिऊन दुकानात येऊन शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या संबंधित दुकानदार यांनी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर अंतर्गत गुनाही नोंद केलेला आहे परंतु संबंधित शिधापत्रिका धारक यांना अटक केलेली नाही याच अनुषंगाने आज उस्मानाबाद जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आज सायंकाळपर्यंत आरोपीला अटक न झाल्यास तीन मार्च पासून जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकान हे धान्य वाटप करणार नाही व तसेच वीस मार्चपासून आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे.

 हे निवेदन देताना यावेळी मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष काकासाहेब कासार, जिल्हाध्यक्ष समाधान कदम, प्रफुल्ल कुमार शेटे जिल्हा कोषाध्यक्ष, मनीष सोनकवडे जिल्हा सचिव, राजकुमार पवार जिल्हा सहसचिव, प्रसाद राजे निंबाळकर, अर्जुन साखरे , एस के अजमेरा, जयराम कापसे, माने बालाजी साखरे उत्तम, प्रकाश तोडकरी, ए व्ही किरदत्त,पी. डी.गणेश, व्ही. एम.काझी आदिंसह जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.


 
Top