धाराशिव / प्रतिनिधी-

 अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत धाराशिव व जिल्हा विधीज्ञ मंडळ उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. अंजू एस. शेंडे यांच्या हस्ते दि.१६ मार्च रोजी सत्कार करण्यात आला.

 उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष मा. ॲड‌. मिलिंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधीज्ञ  मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. अमोल गुंड, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष    ऍड अविनाश मैंदरकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रीन लॅन्ड स्कूलच्या प्राचार्या लक्ष्मी स्वामी, तुळजापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे- पाटील, प्रा. उषा वडणे-चौघुले, सहाय्यक शासकीय अभियोक्ता रश्मी नरवाडकर, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, डॉ. अरेफा काझी (वैद्यकीय), लता धनवडे (राजकीय), परिसेविका सुरेखा गवई, वस्त्र उद्योजिका सोनाली पडवळ व ज्येष्ठ विधीज्ञ आशा टेळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला प्रतिनिधी ॲड. प्रतीक्षा मोरे, ॲड. वैशाली वाटाणे-आवाड, जिल्हा मंडळाच्या सहसचिव ॲड. स्वाती शिंदे, अधिवक्ता परिषदेच्या महिला प्रमुख ॲड दिपाली जहागिरदार आदींसह महिला विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अर्चना नवले यांनी तर सूत्रसंचालन ॲड. प्रतीक्षा मोरे यांनी व उपस्थितांचे आभार ॲड. भाग्यश्री कदम यांनी मानले.


 
Top