परंडा / प्रतिनिधी-

 ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. लटके यांच्या पक्ष प्रवेशानंतर परंडा शिवसेनेना व भूम शिवसेनेच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता.‌शुक्रवारी शिवसेना लोणी सर्कलच्या वतीने येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात लटके यांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी नालगावचे बापुराव करळे, ढगापिंपरीचे उपसरपंच अशोक गरड, वडनेरचे माजी सरपंच विष्णु सांगडे, आसूचे उपसरपंच अमोल जगताप, उपसरपंच नारायण सांगडे, आवरपिंपरीचे माजी सरपंच सुरेश डाकवाले, सरपंच विकास नरुटे, पिंपळवाडीचे उपसरपंच रुपेश काळे,  ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव, वडनेर ग्रामपंचायत सदस्य औदुंबर पालके,  माजी सरपंच संतोष खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय खांडेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाबराव शिंदे, सोशल मीडिया प्रमुख शहाजी ढोरे पाटील, विकास काशिद यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसेना उपस्थित होते. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून लटके यांच्याशी विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा केली. होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

 
Top