परंडा / प्रतिनिधी-

सिना - कोळेगाव प्रकल्प अंतर्गत पाणी कंडारी शाखा कालवा येथून तालुक्यातील सोनारी, कंडारी, भोंजा हवेली, कुभेंजा, मुगांव, कार्ला, अनाळा, खानापूर, रोसा, जामगांव येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात रब्बी हंगामातील पिकांना व मुख्या जनावरांना पशु पक्षांना पाणी सोडले यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजी सावंत यांनी मुंबई येथे बैठकीत पाणी विषयी आदेश दिले आणि सिना कोळेगाव प्रकल्प चे अधिकारी शिगांडे अधीक्षक अभियंता ,मस्तुद ,कार्यकारी अभियंता संजय राजगुरु ,उप अभियंता , पाटील, अभियंता सतिश जोशी , शाखा अभियंता गवळी , सहाय्यक अभियंता तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून पाणी उपलब्ध झाले असुन दिनांक २३ रोजी भोंजा हवेली येथे पाण्याचे पुजन करण्यात आले यावेळी सरपंच समाधान कोळी, डायरेक्टर गणेश नेटके, दत्ता मोरे, अमोल नेटके, भिमराव भांदुर्गे, देविदास सरवदे तसेच वेळोवेळी शेतकरी एकत्र येऊन पाण्याविषयी बैठक घेऊन एकजुटीने नियोजन केले असून मा. सरपंच नवनाथ मोरे, शेतकरी अंकुश ईटकर, बागायतदार सागर भांदुर्गे, गणेश नेटके, प्रसिध्दी प्रमुख फिरोज शेख, बापू लष्कर, दत्ता नेटके, पै तात्या भागडे, शिवश्री नवनाथ नेटके, श्रीमंत महानवर, राजेंद्र मोरे, पिंटू कदम, शिध्देश्वर भोजने, दादा हावळे, लक्ष्मण रेवडकर, प्रदिप मोरे, गणेश मांजरे, खंडू मांजरे, शिध्देश्वर भांदुर्गे, सुहास मुळे, निखिल मोरे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top