धाराशिव / प्रतिनिधी-

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा - उस्मानाबाद द्वारा आयोजित कला अविष्कार अकादमी संचलित हौशी छंदी गायक समुह मेलडी स्टार ,जिल्हा संस्कार भारती समितीचे कलावंत यांच्या कराओके गायन पाडवा संध्या मैफिल छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाली. 

प्रथम राज्यस्तरीय प्रसिद्ध असलेली दर्जेदार  गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धेचे बोधचिन्हाचे विमोचन धनंजय शिंगाडे, कवी राजेंद्र अत्रे, मेलडी स्टार प्रवर्तक युवराज नळे , शशीकांत सुर्यवंशी आयोजक विशाल शिंगाडे , नाट्य परिषदचे धनंजय कुलकर्णी समन्वयक रवींद्र कुलकर्णी संस्कार भारती पदाधिकारी कलाध्यापक शेषनाथ वाघ आदि मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. पाडवा संध्या मैफीलीचे कलावंतांचा धनंजय शिंगाडे, आयोजक विशाल शिंगाडे , कवी राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व गंगाधर करंडक  बोधचिन्हाचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलाच्या गजरात मैफलीची सुरुवात शरद वडगावकर यांनी केली त्यानंतर रवींद्र कुलकर्णी, युवराज नळे , धनंजय कुलकर्णी ,कु. प्रगती शेरखाने , शेषनाथ वाघ , अक्षय भन्साळी , मुकुंद पाटीलमेंढेकर , पद्माकर कुलकर्णी, अँड दिपक पाटील, नितीन भन्साळी, अभिजीत शेळके, श्यामसुंदर भन्साळी, नितीन बनसोडे, सुजीत अंबुरे , सुशील कुलकर्णी कु.जयश्री अत्रे यांनी गायन केले. प्रभाकर चोराखळीकर आदि मान्यवर उपस्थित होते, स सागर चव्हाण, सुगत सोनवणे, बापू साबळे, सत्यजित माने , रोहित कुलकर्णी ,ताहेर शेख , रणजीत गायकवाड, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष तथा गंगाधर करंडक आयोजक विशाल शिंगाडे यांनी आभार मानले .

 
Top