धाराशिव/ प्रतिनिधी-

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील बुधवारी दि.29 मार्च 2023 रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यालय प्रतिष्ठाण भवन, धाराशिव येथे दुपारी 2:30 वाजता, संवाद बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आ.राणाजगजितसिंह पाटील व माजी आ.सुजितसिंह ठाकुर उपस्थीत राहणार आहे.

 या बैठकीत  नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना, अडीअडचणी व कर्ज वाटपाचा आढावा घेतला जाणार आहे. दौऱ्यात काही यशस्वी व्यवसायिकांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर बैठकीस जिल्हयातील समाज बांधव, तरुण वर्ग यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.

 
Top