धाराशिव / प्रतिनिधी-
सूरत चेन्नई प्रकल्पासाठी येत्या तीन महिन्यात भूसंपादनाची कामे पूर्ण करावी तसेच संपादित केलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांनी हरकत घेतल्यास त्यांना प्रतिसाद देऊन पुढची कार्यवाही करा,जिल्हयात 1 एप्रिलपासून सर्व कार्यालय आणि विभागांनी झीरो पेंडेंसीचा अवलंब करून प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचनाही  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी सूरत –चेन्नई प्रकल्पाबाबत आढावा घेताना डॉ.सावंत यांनी भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले.
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा परिषदेचे माझी उपाअध्यक्ष धनंजय सावंत आदीसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
 पालकमंत्री म्हणाले जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगासाठी शिबीर घेऊन त्यांना उपचारासोबत दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्रही या शिबीरातून देण्याचे नियोजन करावे,भुमी अभिलेख कार्यालयातील सर्व प्रलंबीत प्रकरणांना तात्काळ मार्गी लावून तसा अहवाल सादर करण्याचे ही डॉ.सावंत यांनी निर्देशित केले.  


 
Top