धाराशिव /प्रतिनिधी-

गुलामगीरीच्या कलंक पुसुन जिल्ह्याला पुन्हा मुळ नाव धाराशिव दिल्याबद्दल भावसार क्षत्रिय समाजाने केंद्र व राज्य सरकारचे आभार मानुन सरकारच्या निर्णयाला पाठींबा व्यक्त केला आहे.

या बाबत भावसार क्षत्रिय समाजाने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठवीलेल्या निवेदनात म्हटले आहे, धाराशिव हे मुळ नाव जिल्ह्याला मिळावे यासाठी अनेक वर्षांपासुन प्रयत्न सुरू होते. जिल्ह्यातील बहुतांश लोक जिल्ह्याचा उल्लेख धाराशीवच करत होते. या नावासाठी संघटना व नागरीकांनी आंदोलने ही केली. उस्मानाबाद नावाला नागरीकांचा धार्मिकदृष्टया विरोध नव्हता जुने नांव धाराशिव मिळावे हीच रास्त मागणी होती. निजामशाही जुलमी राजवट होती. शेवटच्या निजामाच्या नावावरून धाराशिव नाव बदलुन उस्मानाबाद दिले . या राजवटी विरोधात मोठे आंदेालन झाले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशाने झालेल्या पोलीस कारवाईत निजामाची राजवट संपुष्टात आली व जनतेला स्वातंत्र्य  मिळाले मात्र उस्मानाबाद नाव कायम राहीले जिल्ह्याचे हे नाव बदलुन मुळ धाराशिव नाव देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. यासाठी लढाही सुरू होता. या लढ्यास अखेर यश आले आहे. त्याचे स्वागत करून निर्णयाला पाठींबा व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनावर अध्यक्ष वैभव हंचाटे विरनाथ फटाले, महेश अंबुरे, अभय हंबीरे, किरण कठारे, अशोक रणसुभे, अर्पिता कठारे, सतिष अंबुरे आदींच्या सह्या आहेत.


 
Top