धाराशिव / प्रतिनिधी-

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयामध्ये वैयक्तीक लाभाच्या योजेनेमधुन तुती व फळबाग लागवड अभियान राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हयातील शेतकरी यांची उन्नती व समृध्दी करीता जिल्हा प्रशासनाने नरेगा अंतर्गत 10 हजार एकर क्षेत्रावर तुती लागवड व 10 हजार एकर क्षेत्रावर फळबाग लागवड उदिष्ट निर्गमित केले आहे. सदर उदिष्ट प्रापती करीता सन 2022-23 उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या महारेशीम अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शेतकरी, लाभार्थ्यांना, नर्सरी चालक, चॉकी सेंटर चालक, प्रगतीशील शेतकरी यांना तुती लागवड पुर्व प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 

 त्याअनुषंगाने तुती लागवड अभियानासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा तालुकास्तरीय आढावा संबंधित तालुक्याच्या ठिकाणी पुढील वेळापत्रकाप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे.

  उमरगा  येथे 20 मार्च 2023, रोजी सकाळी 11 ते 1 दुपारी लोहारा येथे 3 ते 5 उस्मानाबाद येथे 21 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 1 तुळजापूर  येथे दुपारी  3 ते 5  भूम येथे 23 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 1 परंडा येथे  दुपारी 3 ते  5 वाशी येथे 24 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 1 कळंब येथे  दुपारी  3 ते 5  असे  बैठकीचे ठिकाण असेल

      उपरोक्त प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील तुती लागवडीच्या आढावा बैठका आयोजित करण्यात आलेल्या असून सदर आढावा बैठकीस उपजिल्हाधिकारी(रोहयो), जिल्हा रेशीम विकास अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बँकर्स, नर्सरी चालक, चॉकी सेंटर चालक, शेतकरी लाभार्थी, प्रगतीशील शेतकरी, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण, वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग, उपविभागीय कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामरोजगारसेवक इत्यादी अधिकारी/कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले आहे.


 
Top