धाराशिव / प्रतिनिधी-

 डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन इस्लामपुरा डिकसळ,(ता.कळंब)  येथे  करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात इस्लामपुरा डिकसळ व परिसरातील सर्व वयोगटातील ११०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे इम्रान मुल्ला, ग्रा.पं.सदस्य रफिक सौदागर, ग्रा.पं.सदस्या सौ.इर्शाद रफिक सय्यद, ग्रा.पं.सदस्य मोमीन मनियार, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष विकास कदम, पत्रकार अभय गायकवाड, अरबाज सय्यद, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ श्वेता चितगर, डॉ. संदीप चौधरी, डॉ. सचिन ढगे, डॉ.श्रुती गामी, डॉ.सिध्दी वायकर यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हळ, अमिन सय्यद, पवन वाघमारे, मुकुंद कोरे, निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे, व डेसळ उपकेंद्राच्या आशा कार्यकर्ता संध्या काळे, ज्वाला धावारे, निता सरवदे, संगीता राऊत, दिप्ती तरकसे, ज्ञानेश्वरी मगर यांनी परीश्रम घेतले.

 
Top