धाराशिव / प्रतिनिधी-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार ने महिलांना एसटी प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेत महिलांची आरोग्य तपासणीची सुविधा मोठ्या शहरातुन घेण्यास वाव मिळाला आहे. 

महिला व ज्येष्ठ महिलांना वय वाढेल तसे अनेक आरोग्यच्या तक्रारी निर्माण होतात. धाराशिव शहर व जिल्हयात आरोग्य तपासणीच्या अत्याधुनिक सुविधा नाहीत त्यामुळे महिलांना एखादा त्रास होत असेल तर अत्याधुनिक आरोग्य तपासणी करण्यासाठी सोलापूर किंवा पुणे येथे जाण्याशिवाय पर्याय राहत नाहीत. शिंदे व फडणवीस सरकार ने एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने याचा लाभ आता महिला घेत आहेत. धाराशिव येथील सौ. रेणुका प्रल्हाद धत्तुरे (वय ६४) यांची गेल्या कांही महिन्यापासून सोलापूर येथील खासगी कॅन्सर हॉस्पीटल मध्ये ऑपरेशननंतर पुढील उपचार चालु  होते.  यासाठी त्यांच्या सुनबाई सौ. मिनाक्षी संभाजी धत्तुरे या त्यांना घेऊन धाराशिव-सोलापूर बसने जात असत.   परंतू गेल्या कांही महिन्यापासून सोलापूर जाणे येणे यावर वाढत्या बस तिकीटामुळे मर्यादा आल्या होत्या. परंतू  एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळताच सुनेने सासूला आवर्जुन सोलापूर येथील हॉस्पीटल येथे उपचारासाठी  घेऊन गेल्या. यावेळी सोलापूर -धाराशिव  एसटी बसच्या महिला वाहक अश्विनी नागनाथ बनसोडे यांनी सुनबाई-सासुला आरोग्य उपचारासाठी बसने घेऊन जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.  तर नियमीत आरोग्य तपासणी होत असल्यामुळे सौ. रेणुका धत्तुरे यांना ही थोडा आराम मिळाला. एसटी बस प्रवासात सवलत मिळाल्याने सुनेने सासुच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिल्याचे मानले मानले जात आहे.

गॅस िसलेंडरलापण ५० टक्के सवलत द्या 

महाराष्ट्र सरकार ने ज्या प्रमाणे महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देऊन महिलांचा सन्मान केला. त्या प्रमाणेच केंद्र सरकार ने महिलांना वाढत्या महागाईच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरवर ५० टक्के सवलत द्यावी, असे मत  सौ.मनिक्षी संभाजी धत्तुरे यांनी व्यक्त केले आहे. 


 
Top