कळंब / प्रतिनिधी-

पी .एम. किसान शेतकरी योजनेचे हप्ते ऑनलाईन करून देतो म्हणून कागदपत्र घेतले व शेतकऱ्यांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेतल्याप्रकरणी शेतकरी रवींद्र हरकर  व पंधरा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभरच्या जवळपास शेतकऱ्याला फसवल्याची चर्चा होत आहे.

कळंब पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संदीप माळी व त्याचा सहाय्यक चौरे यांचे गजानन पार्क येथे ऑनलाईन सेवा केंद्र होते. तिथे त्यांनी शेतकऱ्यांना बोलावून ऑनलाईन पैसे जमा करून देतो म्हणून कागदपत्रे घेतली, पण माझे बँक ऑफ इंडिया  च्या खात्यावरती पैसे जमा न होता , फिनो बँकेत  खोटे अकाउंट काढून जमा केल्याचे समजल्यावर त्या बँकेत चौकशी साठी गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी संदीप माळी यांनी चार हजार रुपये काढून घेतल्याचे सांगितले. माळी यांनी  फसवल्याचे लक्षात आले. यानंतर जवळपास शंभर शेतकऱ्यांचे पैसे हडप केल्याची चर्चा असून, पंधरा शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संदीप माळी व चौरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकारामुळे शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे. संदीप माळी यांनी त्यांचे कार्यालय हि बंद केले आसून, त्याचा संपर्क हि होत नाही.

 
Top