धाराशिव / प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कायापालट करण्याची क्षमता असलेला  अतिशय महत्त्वकांक्षी व बहुप्रतिक्षित "टेक्निकल टेक्स्टाईल पार्क " महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उभारणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना विधानसभेत केली. 

आ राणा जगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरून सुमारे दहा १० हजार युवक युवतींना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची घोषणा ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी २०१९ मध्ये धाराशिव येथे महाजनादेश यात्रेदरम्यान केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी यांना प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. सदर आदेशान्वये के.पी.एम.जी. संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र तदनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले व हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे वारंवार मागणी करूनही साधी बैठक देखिल घेतली गेली नाही. मात्र शिंदे-फडणवीस सरकार येताच ही टेक्निकल टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांनी बैठक घेऊन केली व आज टेक्निकल टेक्स्टाईल पार्क " महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उभारणार अशी घोषणा आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सभागृहात केली.

केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्याबाबत यापूर्वीच आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केंद्रीय मंत्री ना. पियुजी गोयल यांची भेट घेतली होती व त्यांनी याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केलेले आहे.

शिंदे फडणवीस सरकारने  कौडगाव औद्योगिक क्षेत्रात टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला मंजुरी देऊन मराठी नव वर्ष व गुढी पाडव्याची धाराशिवरांना मोठी भेट दिली आहे. याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांचे धाराशिव जिल्हावासीयांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

 
Top