धाराशिव / प्रतिनिधी-
  लातूर टेम्भुर्णी मार्गावर तीन जिल्हे येतात यामध्ये तीन खासदार पाच आमदार असून देखील रस्ता मात्र खेडेगावापेक्षा बत्तर आहे. लोकप्रतिनिधी नावालाच का असा सवाल जनतेतून होत आहे. गेली वीस वर्षांपासून रस्ता मोठा होणार हीच चर्चा ऐकावयास मिळत होती. प्रत्येक्षात मात्र होणार कधी ही शंका नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे  
खराब रस्त्यामुळे अपघात व चोऱ्यांचे प्रमाणात  वाढ झाली आहे.  कसबे तडवळे लातूर ते मुरुडकोला सुमारे वीस किमीचा रस्ता झाला असून पुढे मुरुडअकोला ते टेम्भुर्णी हे दीडशे किलोमीटर चे अंतर खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर दीडशे किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे साडेसहा तास एवढा वेळ लागत असून खराब रस्त्यामुळे अपघाता बरोबर चोऱ्यांचे  प्रमाणांत मोठी वाढही झाली आहे . त्यामुळे हा रस्ता चोरट्यांचा अड्डा बनला आहे. 
  याबाबत सविस्तर वृत्त असे  की, हा लातूर टेम्भुर्णी रस्ता लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या तीन जिल्ह्यातून जातो  गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचा बोलबाला च चालू असून काम मात्र काहीच दिसतं नसून या खराब व अरुंद रस्त्यामुळे अनेक वाहनांची वाहतूक औसा तुळजापूर सोलापूर मार्गे पुणे चालू झाल्याने प्रवाशी व व्यापारी यांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. लातूर ते टेम्भुर्णी या रस्त्यावर पुर्वी तासाला शेकडो अवजड वाहने ,लहान वाहने वाहत होते. यामध्ये मालवाहतूक  वाहन ,बस ,लक्जरी ,चारचाकी वाहने,ऊस वाहून नेणारे वाहने ,शेतकरी यांचा माल घेऊन जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात होते.  आता मात्र खराब रस्त्यामुळे सारखे छोटे मोठे अपघात वाहनांची खराब रस्त्यामुळे टायर फुटणे ,गाडीचे पाटे तुटणे,चेसिस बेंड होणे अश्या तक्रारी वाहनचालक करत आहेत ही गोष्ट संबंधित शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीनां कशे दिसतं नसतील हे आश्चर्य आहे. या खराब रस्त्यामुळे अवजड वाहनासह ,लहान वाहने, मोटर सायकलीचे छोटे मोठे अपघात, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत तरी हा मार्ग लवकरात लवकर करावा अशी मागणी प्रवाशी ,व्यापारी, व शेतकरी वर्गातून होत आहे .
विलासराव असते तर 
लातूरचे सुपूत्र व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी लातूर-येडशी-टेंभुर्णी हा मार्ग चौपदरीकरण करण्याचे निश्चित केले होते. परंतू त्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्री मंडळात मंत्री म्हणुन नियुक्ती झाली. आिण नंतर आजरामुळे त्यांना या कामाकडे लक्ष देता आले नाही, त्यामुळे लातूर-टेभुर्णी या मार्गाचे विस्तारीकरण रखडले. विशेष म्हणजे विलासराव आपल्या भाषणात लातूर-मुरूड-ढोकी-येडशी- बार्शी-कुर्डूवार्डी या मार्गाचा आवार्जुन उल्लेख करून एकादा किस्सा सांगत असत. 


 
Top