धाराशिव / प्रतिनिधी-

  पोलीस मुख्यालयात धुलीवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. जिल्हा पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांनी या प्रसंगी पौर्णीमा होळीचे महत्व विशद करुन सांगितले की, मणुष्याच्या भावना ह्या रंगाशी निगडीत असतात. जिवन अनंदीपणाने जगले पाहीजे. जुन्या कट्टु आठवणी , प्रसंग यांना विसरुन नव्या उमेदीने जिवनाला सामोरे गेले पाहीजे. 

 या कार्याक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक   नवनीत कॉवत, पोलीस निरीक्षक विजयंत जैस्वाल, स्थागुशा पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, राखीव पोलीस निरीक्षक लालताप्रसाद दुबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बारवकर, पवार, भराटे, कासार, चौधरी, निलंगेकर व मुख्यालयीन व इतर सर्व पोलीस अंमलदार हजर होते. सर्वांनी नृत्याचा आनंद लुटत धुलीवंदन साजरे केले.


 
Top