धाराशिव / प्रतिनिधी-

 आई होणे हे प्रत्येक महिलेस संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण आसतो. परंतु अनेक जन्मातेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. नियमित तपासणी आणि त्रास सुरू झाल्यानंतर वेळेत रुग्णालयात दाखल करण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अनेक महिला मृत्यूच्या दारात लोटले जातात. हा धोका टाळण्यासाठी गुड न्यूज नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे गर्भवतींची तपासणी केली पाहिजे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन बोडके यांनी केले आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात वर्षभरात जवळपास 25 हजार प्रसूती होतात. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण कमी आहे देशात एक लाख जन्मामागे 97 मातांचा मृत्यू होतो, तर महाराष्ट्रात 33 माता मृत्यू होतात. अति रक्तस्त्राव, उच्च रक्तदाबामुळे झटके येणे, जंतुसंसर्ग, रुग्णालयात उशिरा दाखल होणे आदी कारणामुळे माता मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. 2021-22 च्या तुलनेत 2022-23 या वर्षात माता मृत्यूचा आकडा कमी झालेला दिसून येत आहे.

 वर्ष प्रसूती सन 2018-19-  22 हजार 792 माता मृत्यू- 8 सन 2019-20- प्रसूती 22 हजार 70 माता मृत्यू -7 सन 2020-21- प्रसूती 22 हजार 512 माता मृत्यू -8 सन 2021-22 प्रसूती 24 हजार 157 माता मृत्यू-5 सन 2022-23 प्रसूती जानेवारी अखेर 19 हजार 300 माता मृत्यू-2 हे मृत्यू होऊ नये त्यासाठी आरोग्य विभाग तर प्रयत्न करीत आहेतच परंतु महिलांनीही गरोदरपणात काळजी घेणे गरजेचे आहे.

 गरोदरपणात किमान चार वेळा आरोग्य संस्थेमध्ये तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वजन वाढ, रक्तदाब, रक्ताच्या तपासण्या, लघवीच्या तपासण्या व किमान तीन सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव होणे उच्च रक्तदाब व झटके येणे सिजर झाल्यानंतर होणारी गुंतागुंत यामुळे जास्त मातांचा मृत्यू होत असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले.

 परंतु एखाद्या मातेचा मृत्यू होताच माता मृत्यू अन्वेषण समितीकडून याची चौकशी केली जाते. मृत्यूची कारणे शोधून त्यावर उपाय योजना केल्या जात असल्याचे देखील सांगण्यात आले.परंतू मृत्यू होऊच नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनी गरोदरपणात आयरन व फॉलिक ऍसिड तसेच कॅलिशयमच्या गोळयांचे सेवन करावे.या बरोबरच आहार,व्यायम करण्यासह आरोग्य तपासणी वेळोच्या वेळी डॉक्टरांच्या सल्याने सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. यामूळे गर्भातील बाळ स्थिती आणि गर्भाची आवस्था समजते.गर्भवतीने काय काळजी घ्यावी: गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यात आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात जसे की प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे करून घेणे आवश्यक आहे.तसेच दोन टी टी चे इंजेक्शन लसीचे मात्रा घेणे आवश्यक आहे. तीन वेळा सोनोग्राफी जर केली तर सोनोग्राफीमध्ये बाळंतपण किंवा प्रसूती सामान्य होईल किंवा सिझर शस्त्रक्रिया करावी लागणार याचे नियोजन करता येते. हिमोग्लोबिनची तपासणी दर तीन महिन्यांनी करावी लघवीची तसेच रक्तदाब तपासणी करून घ्यावे गरोदरपणात तीन ते पाच वेळा तपासणी करावी तसेच सकस आहार घ्यावा.

 वयाच्या 30 वर्षानंतर मुल होण्याचा आईबरोबर शिशुला धोका संभवतो त्यामुळे 21 ते 29 असे या वयात पहिले मूल होणे योग्य असते म्हणजेच या वयात आई होणे अधिक सुरक्षित असते.

 माता मृत्यू झाल्यास माता मृत्यू अन्वेषण समितीकडून चौकशी करून कारण शोधली जातात व भविष्यात माता मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतु मातांनी ही गरोदरपणात वेळच्यावेळी तपासणी सोनोग्राफी तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी केले आहे. 

 

 
Top