तुळजापूर/ प्रतिनिधी-

  दत्तक मुल घेणाऱ्या रा.प. महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची  संगोपन विशेष रजा देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाव्यवस्थापक यांनी बुधवार दि ८ रोजी काढला आहे.

 अनुषंगाने रा.प. महामंडळात शासनाच्या धर्तीवर दत्तक मुल घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांस १८० दिवसांची विशेष रजा मंजूर करण्याबाबत आदेश देण्यात  आले आहे.  हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

 
Top