परंडा / प्रतिनिधी -

जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन  शैलाताई सूजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

  जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात बोलताना   शैलाताई ठाकूर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करुन त्यांचा सत्कार केला.  यावेळी मा. नगरसेविका  हेमाताई ठाकूर,  मनिषा ठाकूर, शहराध्यक्ष  ज्योती भातलवंडे, शहर उपाध्यक्ष भक्ती देशमुख, सचिव दिव्याताई शेळके, छाया भातलवंडे, वैशाली कुलकर्णी, मंगल काळे तसेच शहरातील इतर महिला उपस्थित होत्या.


 
Top