धाराशिव / प्रतिनिधी-

रूपामाता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या धाराशिव जिल्ह्यातील अग्रेसर  ब्रँडने आगामी उन्हाळा समोर ठेऊन आपल्या नवीन आकर्षक पॅकिंग मधील श्रीखंड व मलईदार लस्सी ही दोन उत्पादने बाजारात आणली आहेत. रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर यांच्या हस्ते नवीन उत्पादनाचे अनावरण झाले. 

यावेळी रुपामाता मिल्क चे एमडी ॲड.अजित गुंड पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे ही सर्व उत्पादने आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधापासून बनवलेली आहेत. लस्सी 200 मिली पॅक आणि प्लास्टिक पाउच मध्ये, तर श्रीखंड 50 ग्रॅम व 100 ग्रॅम  पॅक मध्ये उपलब्ध आहे. यामुळे व्यवसायामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्मनिर्भर व त्याबरोबर जिल्हा ही आत्मनिर्भर बनत आहे. 2016 साली श्री.गुंड   यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या "रुपामाता" दूध डेअरीला आज दररोज 50000 लिटर दूध संकलन करण्याचा टप्पा ओलांडला असून दुधावर प्रक्रिया करून दही, ताक, लोणी, खवा, बासुंदी, पनीर,तूप, लस्सी, श्रीखंड, क्रीम इत्यादी पदार्थ बनवले जातात. तसेच आरोग्यदायी गूळ पावडरने आपले वेगळे स्थान बनवले आहे. 

धाराशिव जिल्हा आणि संपूर्ण मराठवाडाभर प्रसिद्ध असलेल्या "रूपामाता" मिल्कने कर्नाटक, आंध्रप्रदेश पर्यंत आपली ओळख बनवली आहे. असे त्यांनी सांगितले.

रूपामाता  लस्सी आणि श्रीखंड कायम लोकांच्या पसंतीस उतरले असून, यावर्षी ती अजून चविष्ट बनवण्यात आली असून, लोकांनी अवरजून यांचा स्वाद घावा असे आवाहन  अजित गुंड यांनी केले, यावेळी ॲड.ऐश्वर्या  गुंड , जी.एम.बिभीषण माने, जी. एम. (प्रोडक्शन) मनोहर लोमटे, दूध संकलन अधिकारी शुक्राचार्य घाडगे उपस्थितीत होते.

 
Top