कळंब /प्रतिनिधी   - 

 विश्व वंदनिय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त धाराशिव  जिल्ह्यातील  ता. कळंब येथे भीम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विपिन हौसलमल यांच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन विशाल  यांच्या भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील ता कळंब येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंती निमित्त उत्सव समितीचे अध्यक्ष विपिन हौसलमल, उपाध्यक्ष सुरज रणदिवे, वैभव गायकवाड, हर्षवर्धन गायसमुद्रे, महेश बिडवे, राहुल कुंभार, फहाद चाऊस, अमर चाऊस, किरण गायकवाड, किरण यादव, अशोक गायकवाड आणि भीम फाउंडेशन चे  सहकारी यांनी दि.21 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे महागायक म्हणून प्रसिद्ध असलेले ख्यातनाम गायिक साजन विशाल यांच्या भीमगीते, क्रांती गीते व लोकशिक्षणावरील बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ठीक 7:00 वा. महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमाला तालुका आणि परिसरातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने संयोजक विपिन हौसलमल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.


 
Top